कोल्ही पारधी बेड्यावर अज्ञात जंगली जनावरांच्या हल्लात दोन जण गंभीर जखमी

Breaking News अन्य दुर्घटना हिंगनघाट

कोल्ही पारधी बेड्यावर अज्ञात जंगली जनावरांच्या हल्लात दोन जण गंभीर जखमी

प्रतिनिधी:निखिल ठाकरे

हिंगणघाट :- तालुक्यातील कोल्ही पारधी बेड्यावर अज्ञात जंगली जनावरांने सोमवारी रात्रीच्या सुमारास दोद्यांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.जखमी किरण दादाराव पवार वय २६ वर्ष व सतीश कार भोसे असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीच्या सुमारास कोली पारधी बेड्यावर किरण दादाराव पवार हा घराबाहेर झोपून होता‌.यावेळी परीसरातील कुत्रे जोरा जोरात बुकत असल्याने तो जागा झाला यावेळी कुत्रे सैरावैरा पळत होते.याचदरम्यान एका अज्ञात जंगली प्राण्याने किरण दादाराव पवार यांच्यावर हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली हा प्रकार पाहता शेजारी सतीश कार भोसे हा त्या दरम्यान किरण दादारावला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या जंगली प्राण्याने सतीश कार भुसे यांच्यावरही हल्ला केला त्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे त्यादरम्यान हे दोघेही जंगली प्राण्याच्या हल्ल्याने जोराने ओरडत होते व वाचवा वाचवा असे ओरडू लागले तसेच जनावर मारून टाकत जनावर मारून टाकेल असे बोलू लागले हा सगळा प्रकार जवळच्या कोल्हु पारधी बेड्यावर घडलेला आहे. सकाळी सुमारे साडे अकराच्या दरम्यान वन कर्मचारी वन अधिकारी श्री सचिन चाकर कापकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही शहानिशा करण्यासाठी व चौकशी करण्याकरिता आमचे कर्मचारी घडलेल्या ठिकाणी पाठवत आहोत

Leave a Reply

Your email address will not be published.