भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर बजाज वाचनालयात शिक्षक संवाद सभेला करणार संबोधित

अन्य

प्रतिनिधि: एच टी न्यूज इंडिया

वर्धा : बिरो नागपूर पदवीधर मतदार संघाचे महाराष्ट राज्य शिक्षक परिषद पुरस्कृत, भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार नागो पुंडलिक गाणार यांच्या निवडणूक प्रचारार्थ जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 23 जानेवारी 2023 ला जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
वर्ध्यातील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात दुपारी 1 वाजता होणाऱ्या सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, विधान परिषदेचे आ. रामदास आंबटकर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावर, आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, प्रदेश भाजपा सचिव राजेश बकाने, माजी खा. सुरेश वाघमारे, म.रा. शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह अजय वानखेडे, म.रा. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष दीपक ढगे, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहर बारस्कर उपस्थित राहणार आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वर्धा जिल्हा, भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा, शिक्षक आघाडी भाजपा वर्धा जिल्हा यांनी केले आहे.