नरखेड येथील उड्डाणपूल रेती,गिट्टीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठरू शकते अपघातच जंक्शन

अन्य

 

प्रतिनिधी रितेश कान्होलकर

एकेकाळी नरखेड हे ऐतेहासिक शहर म्हणून ओळखले जायचे कालांतराने ते नरखेड जंक्शन म्हणून ओळखले जाऊ लागले कारण तेथून दिल्ली मेन रेल्वे लाईन आहेच तर अमरावती जाण्यासाठी मार्ग जोडला गेला त्याच रेल्वे लाईन वर एक उड्डाण पूल बांधण्यात आला त्यापासून फायदा कमी तर नुकसान जास्त होत आहे कारण उड्डाण पूल असून सुद्धा रेल्वे फाटक हा चालूच आहे व तेथे कित्येक अपघात सुद्धा झाले त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावं म्हणून तिथे जागो- जागी गतिरोधक बसवण्यात आले आहे त्यामुळे वाहनांचा वेग तर नियत्रणात आला मात्र तालुक्यातून किंवा तालुक्याच्या बाहेरून शासनाचा महसूल बुडवून नियमाचे उल्लघन करून रेती आणि गिट्टीची क्षमते पेक्षा जास्त (ओव्हरलोड) वाहतूक करणारे जड वाहने त्या उड्डाणपुलावरून दळणवळण करतात त्यामुळे त्या गतिरोधकावर वाहन हेलकावा घेत असते व त्यातून रेती व गिट्टी सांडत असते त्यामुळें तिथे मोटासायकलस्वार शाळकरी मुले तसेच आम जाणतेचे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून समदित कार्यालयाने या गोष्टीवर लक्ष वेधून ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी.