शिवसेनेच्या दिवाळी स्नेह मिलन सोहळ्यात तुफान गर्दी
प्रतिनिधी राहील शेख काटोल
काटोल:काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते मा. कृपाल तुमाने आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
दिवाळी निमित्त आयोजित या स्नेह मिलन सोहळ्यास काटोल, नरखेड,मोवाड,कोंढाळी सावरगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना पक्षाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान पूर्व विदर्भ सहसंघटक नमाजी अली यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३२६ नागरिकांनी शिवसेना पक्षात भव्य प्रवेश केला. यात किशोर सरायकर, दिलीप गायकवाड,प्रशांत बारई यांचे सहकार्य लाभले,हा पक्षप्रवेश सोहळा संपूर्ण विधानसभा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला.
काटोलच्या इतिहासातील हा पहिलाच शिवसेनेचा स्नेह मिलन सोहळा असून,प्रचंड गर्दीमुळे या कार्यक्रमाला अभूतपूर्व यश लाभले.
या प्रसंगी गडचिरोली संपर्क प्रमुख संदीप बरडे, किशोर सरायकर शिवसेना पुर्व विदर्भ सहसंघटक,सहसंघटक अरविंद बेले,चंद्रपूर संपर्क प्रमुख किशोर राय ,नमाजी अली शिवसेना पुर्व विदर्भ सहसंघटक , शेतकरी स्वावलंबन मिशन प्रमुख ऍड. निलेश हेलोंडे, युवा सेवा विदर्भ सचिव शुभम नवले, नागपूर जिल्हा प्रमुख विनोद सातंगे, जिल्हा संघटक दिलीप गायकवाड,नागपूर शहर प्रमुख सुरज गोजे,महिला उपजिल्हा प्रमुख निताताई भोंडे, कामगार सेना समन्वयक प्रशांत बारई, विधानसभा संघटक रितेश हेलोंडे,प्रशांत मानकर उपजिल्हाप्रमुख, समन्वयक आशिष जयस्वाल,अजय बालपांडे नरखेड तालुका प्रमुख, विपुल देव पुजारी काटोल शहर प्रमुख,संदीप कळसे काटोल तालुका सहसंघटक,यादव बगळदे कोढाळी शहर प्रमुख,जितेंद्र वंजारी,अरूण कोल्हे,किशोर खोजरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात काटोल-नरखेड क्षेत्रातील निष्ठावान शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यात स्व. लेखनदास वानखेडे यांच्या पत्नी, ओमप्रकाश जयस्वाल आणि पुरुषोत्तम धोटे यांचा सन्मान मोमेंटो देऊन करण्यात आला.
या वेळी किरण पांडव यांनी संघटनात्मक कार्यावर भर देण्याचे आवाहन करत आगामी निवडणुकीस सामोरे जाण्याचे आदेश दिले. “आपसी मतभेद बाजूला ठेवून पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केल्यासच आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असेही त्यांनी सांगितले.
माजी खासदार कृपाल तुमाने यांनी शिवसेना जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत शिवसेना पुर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले,या भागातील विकास निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन देत, “काटोल-नरखेड परिसरातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन कामगार सेना समन्वयक प्रशांत बारई यांनी केले. त्यांनी शिवसेनेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि आगामी सर्व निवडणुकांत जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्याची कटीबद्धता जाहीर केली.
प्रास्ताविक काटोल तालुका प्रमुख यांनी केले.