पोहायला गेलेल्या दोन बालकाचा मृत्यू

Sun 02-Nov-2025,07:28 AM IST -07:00
Beach Activities

वरोरा :- वरोरा तालुक्यातील येथील वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या चार बालकांपैकी दोन अल्पवयीन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि. 2नोव्हेंबर ला दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रणय विनोद भोयर, वय 15 बावणे लेआउट वरोरा, रुपेश वीरेंद्र कुळसंगे वय 13 नवीन वस्ती वरोरा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर उमंग धर्मेंद्र आत्राम वय 15 कर्मवीर वार्ड , कृष्णा चंद्रकांत कुईजळे वय 16 रा. नवीन वस्ती वरोरा हे पाण्याच्या बाहेर यशस्वी ठरले. ही घटना आज दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.तुळाना येथील वर्धा नदीवर वरोरा शहरातील चार अल्पवयीन युवके हे पोहण्याचा आनंद घेण्याकरिता आज दुपारच्या सुमारास घरच्यांना माहिती न करिता गेले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक हे चारही बालके पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडायला लागले. प्रणय भोयर व रुपेश कुळसंगे हे बुडायला लागले. तर उमंग धर्मेंद्र आत्राम व कृष्णा चंद्रकांत कुईजळे हे नदीच्या पात्रातून बाहेर येण्यास यशस्वी ठरले. या घटनेची माहिती तुळाना येथील पोलीस पाटील यांनी वरोरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठत नगर परिषदेच्या विहिरीजवळ पोहायला गेलेल्या या दोन युवकांचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांनी मोहिमेकरिता चंद्रपूर येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. पर्यंत सायंकाळी साडेसात पर्यंत या रेस्क्यू टीमने या मृत बालकांचा शोध घेतला असता ते अयशस्वी ठरले. अंधार पडल्यामुळे ही शोध मोहीम थांबविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे चारही अल्पवयीन युवक पाण्यात होत असताना पाण्याच्या खोल प्रवाहात बुडायला लागले असता. मोठमोठ्याने ओरडायला लागले. यांचा आवाज ऐकून बाजूलाच गुरे चारत असलेल्या गुराख्याने नदीच्या पात्रात उडी घेत. उमंग धर्मेंद्र आत्राम व कृष्णा चंद्रकांत कुईजळे यांना नदीतून बाहेर काढले. तोपर्यंत उर्वरित बालके नदीच्या खोल पात्रात बुडाले.