आजची उमळती पिढी आपल्या राष्ट्राचे वैभव - चंद्रकांत उदगीरकर
आजची उमळती पिढी आपल्या राष्ट्राचे वैभव - चंद्रकांत उदगीरकर
नावेद पठाण मुख्य संपादक
बोरगाव (मेघे) शिक्षण आणि ज्ञान या वेगवेगळ्या बाबी असल्या तरी एकमेकांना पूरक आहे. शालेय शिक्षण घेताना अवांतर कला आणि साहित्यांचे ज्ञान मुलांना असणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षणीय आहे मात्र त्यांना योग्य आकार व दिशा देण्याचे आपले दायित्व आपण विसरून चालणार नाही. आजची ही पिढी आपल्या राष्ट्राची संपत्ती व वैभव आहे. त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे ठरते. अशी भावना माजी पोलीस उपायुक्त चंद्रकांत उदगीकर यांनी व्यक्त केले.
ते 12 फेब्रुवारी रोजी बोरगाव मेघे येथील सेंट थॉमस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना बोलत होते. याप्रसंगी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती सत्याम, संचालक विजय सत्याम, आदर्श शिक्षक मोहन मोहिते, सिहान उल्हास वाघ, वर्षा देशपांडे, वेदांत सत्याम, रुची तिवारी, संचाली भलमे, अश्विनी गुरुनुले, लक्ष्मी तिवारी, अपर्णा डफळे, वैशाली नेजेकर, रिजवाना शेख आदि उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभिमान सामाजिक व कौटुंबिक सौहार्दाची भावना रुजविणे ही काळाची गरज असल्याने याबाबत प्रीती सत्याम यांनी आपले मत नोंदविले तसेच इमरान राही यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.