सात दिवसांत सीसीआयने कापूस खरेदी सुरू न केल्यास आंदोलन,अॅड सुधीर कोठारी यांचा इशारा

अन्य

हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांचा इशारा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अद्यापपर्यंत

सौसीआयकडून हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील सर्व अधिकृत केंद्रांवर आधारभूत दराने खरेदी सुरू करणे अपेक्षित होते. परंतु ही खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्याचे मोठे आधिक नुकसान होत आहे. तेव्हा सात दिवसात कापूस खरेदी केंद्र सुरू करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी दिला आहे.

हिंगणघाट बाजार समितीत खासगी कापूस खरेदीचा शुभारंभ १० नोव्हेंबरला झाला, तेव्हापासून १४ डिसेंबरपर्यंत खाजगी व्यापाऱ्यांकडून १ लाख ३३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु सीसीआयकडून हिंगणघाट खरेदी केंद्र घोषीत करूनही व हिंगणघाट सेंटरला दैनदिन होत असलेली कापसाची आवक लक्षात घेता सीसीआयकडून कापसाची खरेदी होणे अपेक्षित असतानाही कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सीसीआयकडून समितीच्या वडनेर उपबाजार येथे आवक कमी असूनही १३ डिसेंबरला कापूस खरेदी सुरू करण्यात आली. यावरून सीसीआयला कापूस खरेदी करावयाचा नसून फक्त खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, असे दर्शवायचे आहे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. सीसीआयमार्फत हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यामधील मंजूर केंद्रावर आधारभूत दराने तत्काळ कापूस खरेदी सुरू करावी, अशी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत समितीने सीसीआयला पत्र देऊन हिंगणघाट येथे चार ते पाच जिनिंगधारकांसोबत कापसाचे जिनिंग प्रेसिंग करण्याच्यादृष्टिने करारनामा करून हिंगणघाट केंद्रावर कापूस खरेदी तत्काळ सुरू करण्याबाबत कळविल्यानंतरही सीसीआयकडून कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. माजी आमदार प्रा. राजु तिमांडे व समितीचे सर्व संचालक सात दिवसाच्या आत हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील सीसीआयच्या अधिकृत कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू न झाल्यास शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमतीने कापूस खरेदीसाठी जनआंदोलन करतील, अशा इशारा सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी दिला आहे.

CLICK TO SHARE