सोलार कंपनी मध्ये मोठा स्पोट,अंदाजे नऊ कामगार स्पोट मुळे मृत्युमुखी

अन्य

प्रतिनिधी:राहील शेख काटोल

काटोल:आज दिनांक 17.12.2023 ला सोलर प्लांट (बारुद कंपनी)बाजारगाव येथे सकाळी 9 वाजाताचे दरम्यान झालेल्या स्पोटात ( युवराज चारोडे, बाजारगाव, ओमेश्वर मच्चीन चाकडोह, मिता उईके अंबाडा,सोनक, आरती सहारे कामठी, श्वेताली मारबते वर्धा, पुष्पा मानापुरे अमरावती, भाग्यश्री ब्रम्हपुरी, रुमिता उईके ढगा,मोसम पटले, पाचगाव) 9 लोकांचा मृत्यू झाला.ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळी भाजपा काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांनी भेट देऊन कंपनीच्या प्रशासनाशी चर्चा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यास तसेच मृतकाचे नातेवाईकांना मोबदला देण्याच्या सूचना दिल्या.सोबत जिल्हा उपाध्यक्ष अयुब पठाण,किशोर गाढवे,शामराव तायवाडे होते.घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

CLICK TO SHARE