कपासी पिकांवर बोंड अळीचा अटॅक

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. मध्यंतरीअवकाळी पाऊस झाल्याने व दाटधुके पडल्यामुळे सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंतरपीक असलेले तुरीला फटका बसला आहे. आता कपासी पिकांवर बोंड अळी आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्पन्न कमी होण्याची भिती निर्माण झाली असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. या शिवाय कपाशीच्या झाडांवर पाने काळे पडणाऱ्या रोगाचे आक्रमण झाले, कापूस काळवंडलाअसून बोंड अळीआल्याने डिसेंबर पर्यंत निघणारा कापूस अगोदरच संपणार असल्याने शेतकली वर्ग धास्तावला आहे. त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

CLICK TO SHARE