कापशी येथे महिलेला अमानुष मारहाण,आरोपी अद्यापही मोकाटच

क्राइम

कापशी येथे महिलेला अमानुष मारहाण अल्लीपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल मात्र आरोपी अद्यापही मोकाटच

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कापशी गावातील महिलला गावातच राहणार्‍या चौघांनी अमानुष मारहाण केल्याची घटना गावातील चौकात दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.यासंदर्भात सदर महिलेने आरोपींविरुध्द अल्लीपुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी मात्र अद्यापही मोकाट असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सविस्तर माहिती अशी की,कापशी येथील रहीवासी सौ.छाया अनिल वासेकर हि दि.५ डिसेंबर रोजी कानगाव येथून बचत गटाची बैठक आटोपून गावात आली असता गावातील रहीवासी विनोद निमसडकर याने तिला चौकात अडवून अश्लिल शिवीगाळ केली.त्यानंतर अजय निमसडकर,आशीष निमसडकर,अमित निमसडकर या चौघांनी तिला अमानुष मारहाण केली.यात सदर महिला गंभीर जखमी झाली आहे.यात तिचा मुलगा अनिकेत वासेकर हा आला असता त्यालाही आरोपींनी जबर मारहाण केली.यासंदर्भात सदर महिला ही अल्लीपुर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली असल्याचा तिचा आरोप आहे.अखेर चार तासानंतर रात्री ११.३० वाजता तिची तक्रार नोंद करण्यात आली.तिला दवाखान्यात नेण्याचे सौजन्यसुध्दा पोलिसांनी दाखविले नाही.उपचाराकरीता तिला स्वत: वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल व्हावे लागले.त्यामुळे सदर आरोपी तसेच तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी,अशा आशयाचे निवेदन सौ.छाया अनिल वासेकर यांनी नुकतेच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

CLICK TO SHARE