आम आदमी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

सोशल

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

घोडपेठ मधे चराई करिता सरकारी जमीनीची रजिस्ट्री करण्यात आली अशी तक्रार आम आदमी पार्टी यांना प्राप्त झाली. त्यांनी चौकशी केली असता, हा प्रकार भ्रष्टाचाराची संबंधित आहे असं दिसून आलं. काही पैशांसाठी इतर काही सदस्यांनी मिळून सरकारी जमिनीची रजिस्ट्री एका चाहत्या व्यक्तीला करून दिली अशी बाब उघडकीस आली. तरी या सगळ्या भ्रष्टाचार विषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज शहा यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केली आहे.

CLICK TO SHARE