आज दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी, निर्मलादेवी एज्युकेशन सोसायटी काटोल येथे रोजगार मेळावा घेण्यात आला.

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपूर

काटोल:कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चरणसिंग ठाकूर, सभाप‌ती कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल, दिपकजी पटेल, सदस्य निर्मलादेवी राज्युकेशन सोसायटी, काटोल, किशोर गाढवे सचालक कृ.उ.बी.स. काटोल, , डॉ. तेजस्वीनी कावळे संचालिका, निर्मलादेवी एज्युकेशन सोसायटी, राकेश सिंग, अध्यक्ष, निर्मलादेवी एज्युकेशन सोसायटी व अयुब पठाण उपस्थित होते.आयोजित रोजगार मेळाव्यात पुणे, अहमदनगर, चाकन, हिंगणा, चंदपूर, नागपूर, बूटीबोरी, आणि भोपाल या ठिकाणावरून 12 कंपनीच्या शिस्त मंडळाणी सुशिक्षीत युवक युवतींची मुलाखाती घेऊन त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या मेळाव्यात एकूण ३१५ युवक युवतींनी रजिस्ट्रेशन केले व त्यापैकी ९५ युवक युवतींना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले आहे. याप्रसंगी काटोल विधानसभा क्षेत्रातील युवक युवतींना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जितक्या जास्त कंपन्या आन्याचे व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कश्याप्रकारे देता येईल यासाठी प्रामाणीक प्रयत्न करू असे चरणसिंग ठाकूर म्हणाले. श्री .चरणसिंगजी ठाकूर यांनी तरुण युवक व युतींसोबत प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थाचे सदस्य दिपक पटेल यांनी युवक युवतींना रोजगाराबदल मार्गदर्शन केले तसेच डॉ. तेजस्विनी कावळे यांनी आलेल्या युवक युवतीना कला कौशल्य विकास व करियर गायडंस बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालक प्रांज‌ली येवले आणि मोहनी राउत व आभार प्राचार्य श्वेता बांदे यांनी केले.

CLICK TO SHARE