अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या न्याय मागण्यासाठी जि.प.समोर तिव्र धरणे आंदोलन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती,सिटु व आयटक च्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस दि.४डिसे.२३ पासुन बेमुदत संपावर आहेत. आज अठराव्या दिवशी जिल्हा परिषद,वर्धा समोर तिव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांच्या न्याय मागण्यासाठी नागपूर येथे दि.१५ डिसे.२३ रोजी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातीलअंगणवाडी सेविका व मदतनीसांचा हजारोच्या संखेने मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी शासनाच्या वतीने मा. ना. अदीती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री यांनी अधिवेशन संपायच्या आधी आपल्या मागण्या पुर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु मागण्या पूर्ण न केल्यामुळे आज जिल्हा परिषद,वर्धा समोर आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी वर्धा जिल्हा सिटु महासचिव कॉ.भैय्याजी देशकर, वर्धा जिल्हा अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्ष अर्चना मोकाशी, उपाध्यक्ष रंजना सावरकर, सचिव गुंफा कटारे, संजय भगत,आयटकचे वंदना कोळंबकर, मैना ऊके,अलका भानसे ह्यांची प्रामुख्यांनी उपस्थिती होती.ह्यावेळी वरुड येथील सरपंच सुनिता ढवळे ह्यांनी पाठींबा दिला.*प्रमुख मागण्या :-* १) शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा लागु करा. २) मासिक पेंशन, ग्रॅज्युईटी, भ.नि,नी , सामाजिक सुरक्षा विमा लागु करा.३) सन २०१४ पासुन प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे त्वरीत निकाली काढा.४) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका ह्यांना सेविका पदावर थेट नियुक्ती करा.५)अंगणवाडी पुरक पोषण आहाराचे माहे मे २०२३ पासुन प्रलंबित देयके त्वरीत मंजुर करा.६) चार श्रम संहिता कायदे त्वरीत रद्द करा.७) वैद्यकीय भरपगारी रजा लागु करा.८) सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण त्वरीत थांबवा.९) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे २६०००/- व १८०००/- भरीव मानधन लागु करा. १०) महानगर पालिका हद्दीत अंगणवाडी केंद्राला रु.५०००/- ते ८०००/- घरभाडे लागु करा.११) महिला बचत गटा तर्फे दिल्या जाणाऱ्या अति कुपोषित व कुपोषित बालकां करीता अनुक्रमे १६/- व २४/- आहाराचा दर वाढवुन द्यावा.१२) पोषण ट्रॅकर अँप मराठीत करा. धरणे आदोलनात सुनंदा महाजन,वणिता बलविर,करुणा शंभरकर,ज्योती नखाते, वैशाली जाधव, रेखा बोरकर,मिना बुधबावरे, वैशाली खंडार,अर्चना गोमासे, संगीता धुर्वे, मालती मनवर, मिनाक्षी गव्हाळे, आम्रपाली डंभारे, मिना कुरसुंगे,लक्ष्मी पाठक,संगीता कोहळे, दिपाली चावरे,वर्षा बारसागडे, विजया कपाट,अर्चना बालपांडे, योगीता वाघमारे, नंदा पाटील, रेखा वाघमारे,वनिता पिंपळे,निता ढोडरे, आरती दोडके,रक्षा खराडे, नुतन चौधरी,पुष्पा नेहारे,शुभांगी उडान, सुनिता बेले, रेखा सुपारे,हिरा बावने, मिना ढोके,मंगला इंगोले,सुरेखा रोहणकर,यमुना नगराळे, वंदना रेवतकर, ज्ञानेश्वरी डंभारे,करुणा नागोसे, चंदा मेश्राम तसेच वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी व मदतनिस दोन हजाराच्या वर उपस्थित होते.

CLICK TO SHARE