गोंडपिपरीत अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गोंडपिपरी तालुक्यात उत्तम दर्जाचा रेती साठा असून नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून दुसऱ्या राज्यात देखील रेतीची वाहतूक होताना दिसत आहे. रेती तस्कर खुलेआम रेतीची वाहतूक करताना आढळत असून मोठे माफिया तयार झाले आहे. घाटाशेजारी हजारो ब्रास रेती साठा रात्रभरात जमा होतो अचानक गायब होतो. पुन्हा आढवडा भरात रेतीचे ढिगारे जसेच्या तसे दिसत असतात. अनेक माणसे घाटापासून ते गोंडपिपरी पर्यंत अधिकाऱ्यांवर नजर ठेवले असतात. कुलथा घाटाकडे सामान्य नागरिक शेताकडे जाताना त्यांच्यामध्ये भीती आहेत.

CLICK TO SHARE