हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील रशेष गिरीधरजी राठी यांचा भाजपा मध्ये प्रवेश

सोशल

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट येथील रशेष गिरीधरजी राठी यांचा भाजपा मध्ये प्रवेश

माजी खासदार व भाजपा ज्येष्ठ नेते माननीय दत्ताजी मेघे साहेब तसेच आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

दि.२२ डिसेंबर २०२३हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. आज दि.२२ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट येथील रशेष गिरीधरजी राठी या कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता भाजपात प्रवेश केला. सदर प्रवेश सोहळा आज दि. २२ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रशेष गिरीधरजी राठी या कार्यकर्त्याला रितसर भाजपात प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम माजी खासदार व भाजपा ज्येष्ठ नेते माननीय दत्ताजी मेघे साहेब तसेच आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. उपरोक्त कार्यक्रमाचे वेळी माजी खासदार व भाजपा ज्येष्ठ नेते माननीय दत्ताजी मेघे साहेब तसेच कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ दिघे, अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री नितीन मडावी, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर,भारतीय जनता पार्टी विधान सभा प्रमूख संजय डेहणे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट संचालक प्रफुल बाडे, समाजसेवक सुनील डोंगरे, विलास खूनकर, हिंगणघाट भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे, समुद्रपूर माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूरचे संचालक गोपाळराव वंगळ, रामकृष्ण उर्फ बाळासाहेब इंगोले, माजी पंचायत समिती सभापती रवींद्र दांडेकर, फुलचंद चव्हाण, गजाननराव टोंग, शेषराव तुळनकर, इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

CLICK TO SHARE