अन्नदाता दिन साजरा करण्यात आला

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्टेट बँक शाखेच्या वतीने अन्नदाता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.यावेळी गावातील शेतकरी बांधवांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले, व गुणगौरव करण्यात आला. वर्षभर शेतामध्ये काम करीत असतात अशा शेतकरी बांधवांना शाखा व्यवस्थापक व भारतीय स्टेट बँक टीमच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळेस गावातील विजय जयस्वाल माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे, ग्रा प. सदस्य सतीश काळे यावेळेस उपस्थित होते.

CLICK TO SHARE