स्वयंपाकी – मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकाऱ्यांनी बोलावली AAP सोबत बैठक

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर- आज दि. 22/12/2023 चंद्रपुर जिल्ह्य़ात फक्त बल्लारपूर मध्येच असलेली केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली, स्वयंपाकी व मदतनीस महिलांचे मानधन यांच्य प्रश्नावर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी साहेबांना तात्काळ बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आज मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी, केद्रीय स्वयंपाकगृह कंत्राटदार व मदतनीस महिलांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी मदतनीस महिलांना शासननियमानुसार दरमाह 2500 रूपये मानधन देण्याची मागणी केली. तसेच हे शक्य नसेल तर केंद्रीय स्वयंपाकगृह पध्दत बंद केली जावी असे म्हटले. या बैठकीत मुख्याधिकारी विशाल वाघ, आप चे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, सचिव ज्योती बाबरे, प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, उपाध्यक्ष अफजल अली, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सहसचिव आशिष गेड़ाम तसेच सर्व मदतनीस महिला उपस्थित होते.

CLICK TO SHARE