भीमा कोरेगाव शौर्या दिनानिमित्त १ जानेवारीला प्रबोधन कार्यक्रम

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

कानगाव येथे १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अल्लीपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, उपसभापती हरीष वडतकर, सरपंच सपना प्रकाश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते गौरव ओंकार, सुमीत भगत उपस्थित राहणार आहे. कानगाव येथील सिंगोटे ले-आऊट विकास विद्यालयाजवळ होणा-या या कार्यक्रमात सायंकाळी ५ ते रात्री ११ पर्यत बहुजन क्रांतीचा बुलंद आवाज, भीम विचारांची तोफ कॅसेट फेम सुप्रसिध्द गायक विकास राजा (नागपूर) यांचा भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भीमा कोरेगाव उत्सव समिती कानगाव (नांदगाव) यांनीकेले आहे

CLICK TO SHARE