गोडाऊनचे शेटरचे कुलूप तोडून २० क्विंटल कापूस चोरी

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथिल शेतकरी भोजराज कामडी यांच्या आजनसरा रस्त्यावरील शेतातील गोडाऊन मध्ये ठेवलेल्या २०० क्विंटल कापसा पैकी अज्ञात चोरट्यानी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनचे शेटरचे कुलूप तोडून जवळपास २० क्विंटल कापूस चोरुन नेल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली असुन.यासंबंधी शेतकरी भोजराज कामडी यांनी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वडनेर येथील शेतकरी भोजराज कामडी यांच्या आजनसरा रोडवरील शेता मधील चार हजार चौरस फुटाच्या गोडाऊन असून त्यामध्ये चोरी झाली आहे. पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहे

CLICK TO SHARE