वरोरा येते नव्या Sdpo आय पी एस नियोमी साटम यांनी संभाळला कारभार.

अन्य

अवैध रेती उतखन व वाहतूक गौण खनिज दारू विक्री गुनेगारी यावर अंकुश लावण्याचे आव्हान.

प्रतिनिधी:पवन ढोके (वरोरा )

वरोरा भद्रावती क्षेत्रात अवैध धंदेवाईक व गुंडांना त्यांची जागा दाखवणारे आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांची जालना येथे बदली झाल्यानंतर या जागेवर कोणता पोलीस अधिकारी येईल याबद्दल या क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागले होते, दरम्यान महिनाभर ही जागा रिक्त असतांना आता या जागेवर मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या आयपीएस नियोमी साटम यांनी पदभार सांभाळला आहे. त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून 19 जून ते 1 सप्टेंबर पर्यंत मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला होता.आयपीएस नियोमी साटम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मूळच्या असून मुंबई येथे स्थायिक आहेत. त्यांच्याकडे वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आलेली जबाबदारी ही आव्हानात्मक आहे खरी, पण त्यांनी आपल्या कर्तव्य व अधिकाराचा योग्य वापर केला आणि गुन्हेगारांवर कायद्याची योग्य आयुधे वापरली तर त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला निश्चितपणे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतूक, अवैध गौण खनिज उत्खनन, सट्टा पट्टी, अवैध दारू विक्री व गुन्हेगारी यावर अंकुश लावण्याचे आव्हान त्या कशा प्रकारे स्वीकारतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.मंगळवेढा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारताना त्यांची काय होती प्रतिक्रिया?मंगळवेढा पोलीस स्टेशन चा कार्यभार स्वीकारताना आयपीएस अधिकारी नियोमी साटम यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की “सर्वसामान्य माणसात पोलिसा विषयीची प्रतिमा उंचावण्याबरोबर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यावर भर राहील. एस पी दर्जाचे अधिकार असल्यामुळे मी कुणाच्या आदेशाची वाट बघणार नाही, सध्या वारीच्या बंदोबस्त असल्याने वारी नंतर आपल्या कामाचा अनुभव लोकांना येईल. आता वरोरा भद्रावती क्षेत्रात वाढलेली अवैध कामे व गुन्हेगारी याच्यावर त्या कशा प्रकारे अंकुश लावणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

CLICK TO SHARE