अकोला महानगर पालिका निवडणुकीत रां स प खाते उघडण्याची सज्ज-महादेव जानकर

सोशल

अकोल्यात कार्यकर्ता मेळाव्यात केला आशावाद व्यक्त

प्रतिनीधी:इमरान मिर्झा अकोला

अकोला. राष्ट्रीय समाज पक्ष राज्यांतील सरवसामान्य कष्टकरी जनतेच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळें अकोल्यातील धनाढ्य राजकारण्यांनी शहरांतील व जिल्हयातील सरवसामान्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे जनता अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळें अकोला शहरातील जनता या राजकारण्यांना वैतागली असुन या जनतेसाठी राष्ट्रीय समाज पक्ष एक पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळें येत्या अकोला मनपा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे नगरसेवक निवडून येऊन पक्ष मनपा मध्ये खाते उघडण्यासाठी सज्ज असल्याचा आत्मविश्वास रा स प चे संस्थापक महादेव जानकर यांनी अकोल्यात खैर मोहममद प्लॉट येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.खैर मोह्म्मद प्लॉट येथे रा.स.प शहर अध्यक्ष इमरान मिर्झा यांचे अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावां संपन्न झाला यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले पाटिल, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे, पातूर तालुकाध्यक्ष संदीप उमाळे, पातूर शहर अध्यक्ष संदीप निमकांडे, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष महेश तायडे, मूर्तिजापूर आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष राधेकिसन सोळंके, बाळापूर तालुका अध्यक्ष प्रमोद काळे यांनी रा स प चि भूमिका विषद केली. या कार्यकर्ता मेळाव्यात शहर उपाध्यक्ष सैयद शाहजाद, सचिव मंगेश पळसपगार, योगेश गावंडे, फरहान मिर्झा, नासिरोद्दिन , अब्दुल नाजिम, विशाल पाटील, आसिम नावेद, गजानन गावंडे, निलेश वसतकार, शेख आजम, सै. अजीम, आरीफभाई, यांचेसह पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर जन्मोत्सव समिति युवा अध्यक्ष सुमित नवलकर, व समिती पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सलीमभाई यांनी व्यक्त केले.

CLICK TO SHARE