आज (दि.24) ला सुरू असलेल्या काटोल प्रिमियर लिग KPLचरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

खेल

प्रतिनिधी: साजीद पठाण नागपुर

काटोल:आज (दि.24) ला सुरू असलेल्या काटोल प्रिमियर लिग KPLबक्षीस वितरण समारंभात कृ.ऊ.बा. समिती कटोलचे सभापती चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी माजी पं.स.सभापती धम्मपालजी खोब्रागडे तसेच शहरातील प्रतिष्ठित महानुभाव मंचावर उपस्थित होते.या 9 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणारा संघ टीम ग्लडियटर राहिला तर दुसरे पारितोषिक MVP स्पार्टन्स या संघाने मिळविले. शहरातील खेळाडूंना लवकरच शहरामध्ये सुसज्ज क्रीडा संकुलन उपलब्ध करून देण्याची ग्वाही ठाकूर यांनी दिली.या कार्यक्रमाच्या आयोजन करिता काटोल प्रिमियर लिग कमिटीने खुप परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE