जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची महावितरण उपकेंद्र हिंगणघाटला क्षेत्रभेट

अन्य

प्रतिनिधी:आसीफ मलनस हिंगणघाट

स्थानिय जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय येथील वर्ग अकरावी व बारावी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य वृंदीगत व विकसित करण्याकरीता क्षेत्रभेट करणे गरजेचे होते. याकरिता प्राचार्य श्री एस आर फुटाणे यांच्या विनंतीवरून महावितरण हिंगणघाटचे प्रबंधक श्री हेमंत पावडे सर यांनी विद्यार्थ्यांना नियमानुसार परवानगी दिली. त्यानंतर विद्युत उपकेंद्र पिंपळगाव रोड हिंगणघाट येथे क्षेत्रभेट देण्यात आली. श्री दिलीप मेघरे सर व श्री वड़े सर यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत व कार्यात्मक मार्गदर्शन केले. क्षेत्रभेटीचा शेवट व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे यांनी आभार करून केला. क्षेत्रभेटी दरम्यान तनु दाते, सबा इस्राईल , प्रणाली हिवरे , खुशी देशकर, पुनम मेसरे या विद्यार्थिनींनी पावर ट्रान्समिशन म्हणजे काय ? डीबी का फुटते ? ब्रिदर ला ट्रान्सफॉर्मरचे हृदय का म्हटले जाते? लाइटिंग अरेस्टर चे नेमके काम काय ? लाईट इंडिकेटर च्या वेगवेगळ्या रंगावरून कोणती माहिती मिळते ? सबस्टेशन मध्ये नळाची अरेंजमेंट का केली गेली आहे ? सबस्टेशनल मधील जमिनीवरती गिट्टीची आच्छादन का असते? सबस्टेशन मधील बकेट रेतीने का भरलेली असते ? अशी विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित करून ज्ञान वृद्धिंगत केले.सर्व विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पूर्ण केली.यासाठी प्राचार्य श्री एस आर फुटाणे ,उप प्राचार्य एम एस कुरेशी, कला शिक्षक श्री किशोर उकेकर, प्राध्यापक डॉ.अनिस बेग , व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे, हर्षल बोधनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE