मेंढपाळाच्या २० बकऱ्या अज्ञात चोरट्याने नेल्या चोरुन

क्राइम

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धोत्रा गावातील मेंढपाळाच्या २० बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या ची तक्रार अल्लिपूर पोलिस ठाण्यात मेंढपाळाने दिल्याची माहिती आज सोमवारी २५ डिसेंबरला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितनुसार धोत्रा गावातील अनिल सोनुले यांच्या बकऱ्या गोठ्यात बांधून असतांना २४ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने यातील २० बकऱ्या चोरुन नेल्या यासंबंधी अनिल सोनुले यांनी अल्लिपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढिल तपास ठाणेदार प्रफुल डाहुले करीतआहे.

CLICK TO SHARE