राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात भव्य बाईक रॅली

खेल

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ चंद्रपूर

जिल्ह्यातील बल्लारपूर येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 च्या पूर्वसंध्येला आज चंद्रपूर व बल्लारपूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथे प्रथमतः होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता अभूतपूर्व आहे. यानिमित्ताने आयोजित या बाईक रॅली मध्ये पुरुष व महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यात सहभागी होते.

CLICK TO SHARE