साई नगरी विरोधात ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक ढगे लेआऊट समोर पूर्वेकडे प्रकाश ढगे यांचे शेतात लेआऊट साई नगरी आहे त्या ठिकाणी प्लॉट पडलेले असून सदर साई नगरी चे मालक साहू रा. हिंगणघाट हे असुन लेआऊट चे रोड बांधकाम करीता ठेका अमोल ठोंबरे रा. हिंगणघाट यांचे कडे दिलेला आहे. त्यांनी रोडचे बांधकाम करण्याकरिता मुरूम टिप्पर गाडीने ढगे लेआऊट चे मेन सिमेंट काँक्रिट रोडने रात्र दिवस मुरूम टाकत असल्याने सिमेंट काँक्रिट रोडला भेगा पडल्या आहेत व रोड लगत ग्राम. प.ची नळयोजनेची पाईप लाईन असून या टिप्पर द्वारे नाळाचा पाणीपुरवठा कधी बंद होऊ शकते याकरिता मौका चौकशी ग्राम. प.ने करून झालेले नुकसान भरून निघतील व सार्वजनिक सिमेंट काँक्रिट रोडफुटणार नाही याची मौका चौकशी करून साई नगरी मालक साहू यांना समज दयावी व खराब झालेला रोड दुरुस्त करून घेण्याबाबत त्यांचेकडून हमी ग्राम. प.तिने आपल्या स्तरावर लिहून घ्यावे व इतर योग्य ती कारवाई साई नगरी मालक साहू यांचेवर करावी असे निवेदन ढगे लेआऊट येथिल नागरिकांनी ग्राम. प. ला दिले आहे. यावर ग्राम. प. कार्यालय अल्लिपुर काय कारवाई करेल व ग्राम. प. किती सक्रिय आहे याकडे येथील जनतेचे लक्ष लागलेले आहे.सरपंच नितीनजी चंडणखेडेमला ढगे लेआऊट येथिल नागरिकांचे निवेदन मिळाले असून त्यानुसार मौका चौकशी करून साई नगरी मालक साहू यांना नोटीस देऊन योग्य ती कारवाई करूग्राम. प. सदस्य सचिन पारसडे ढगे लेआऊट येथिल मेन रोडने साई नगरी येथे मुरूम नेत असल्यामुळे खराब झालेला सिमेंट काँक्रिट रोड दुरुस्त करून दयावा अन्यथा योग्य ती कारवाई ग्राम. प. करावी

CLICK TO SHARE