मुख्याधिकाऱ्यांविना सुरू आहे कारभार

अन्य

विशेष प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

जिल्ह्यातील अनेक नगरपालिका व नगर पंचायतीमध्ये स्थायी मुख्याधिकारी नसल्याने विकासकामांचा खोळंबा होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर, मूल या नगरपालिकेत, तर कोरपना, गोंडपिंपरी, जिवती, सावली, सिंदेवाही, भिसी या नगर पंचायतींमध्ये अद्यापही स्थायी मुख्याधिकारी नाही. जवळपासच्या नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांकडे धुरा सोपविण्यात आली आहे. त्यातही त्यांच्याकडे एक ते दोन नगरपालिका व नगर पंचायतीचा प्रभार आहे.

CLICK TO SHARE