बार्टी कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी

अन्य सोशल

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारती पुणे सामाजिक न्याय विशेष सहभागी स्वायत्त संस्था प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे ,सुनील भिसे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर , राठोड साहेब,नाईकवाडे सर यांनी सर्वप्रथम शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांची 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कृषी शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुख यांचे मोठे कार्य आहे महाविद्यालय अभियांत्रिकी पदवी तसेच पदविका तंत्रनिकेतन कृषी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालय सुरू करून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. शेतकरी नेते अनेक आहेत पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे आणि त्यांची व्यथा समजून घेणारे मोजकेच आहेत पंजाबराव देशमुख हे शोषितांचे शेतकऱ्यांचे तारणहार होते ते 1952 ते 1962 या काळात भारताचे कृषिमंत्री होते त्यांनी त्या काळात कृषीआणि शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी काम केलं पंजाबराव शेतकरी भाऊसाहेबांचा उल्लेख पंजाबराव पंजाब असा करू लागले. भारत कृषक समाज ची स्थापना केली .डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित जवारलाल नेहरू आणि इतरांनी 1959 मध्ये दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली ते राष्ट्रीय कृषीसह अनेक संस्थांचे संस्था संस्थापक आणि अध्यक्ष होते यावेळी राठोड साहेब, नाईकवाडे साहेब ,जाधव साहेब ,चव्हाण साहेब, श्रीमती खंदारे मॅडम ,श्रीमती मगर मॅडम ,मोठ्या संख्येने उपस्थित होते

CLICK TO SHARE