आईच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

खेल

प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर जिल्हा स्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 55 किलो वजन गटात प्रथम क्रमांक आणि बेस्ट पोजर टायटल मिळवित गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन । आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आधी सूरजने बल्लारशा, – चंद्रपूर, अमरावती, पालकमंत्री चषक स्पर्धा अशा विविध ठिकाणी स्पर्धेत भाग घेऊन विविध क्रमांक, रोप्य पदक आदी पदके मिळविले आहे. सुरज चंद्रपुरातील जलनगर 5 परिसरात आपल्या आई सोबत राहतो. काही वर्षा आधी – वडिलांचे छत्र हरपले. सुरज चे वडील आमदार किशोर जोरगेवार यांच्या डेकोरेशनच्या व्यवसायात कामावर होते.

CLICK TO SHARE