कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन

हेल्थ

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

देशात व राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तरी देखील सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी दक्षता बाळगावे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. देशात व राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहे. यावर उपाययोजना व प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी देखील बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.

CLICK TO SHARE