घरकुल बांधकामा करिता जलालखेडा,भारसिंगी व भिष्णूर येथून वाळू उत्खननाची परवानगी देण्यात यावी.- चरणसिंग ठाकूर

सोशल

घरकुल बांधकामा करिता जलालखेडा,भारसिंगी व भिष्णूर येथून वाळू उत्खननाची परवानगी देण्यात यावी.- चरणसिंग ठाकूर

वाळूंच्या वाढलेल्या किंमती मुळे अनेक घरकुले अपूर्ण

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

काटोल:दिनांक १६/१०/२०२३ विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल, शबरी व ठक्कर बाबा अशा विविध योजने अंतर्गत घरकुल मंजूर आहेत. त्यापैकी काही घरांचे बांधकाम हे अगोदरच झालेली आहेत. परंतु रेती ( वाळू) तसेच आता बांधकाम साहित्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून रेतीचा ट्रक जवळ जवळ ४५ हजार रुपये प्रमाने उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वसाधारण घरकुल धारकांनी बांधकाम करणे परवडणार नाही.
घरकुल लाभार्थीना बांधकामाकरिता वाळू माफत दरात, कोणतीही रॉयल्टी न घेता शासनांनी उपलब्ध करीन घावी, किंवा भारसिंगी, जलालखेडा व भिष्णूर येथून वाळू उत्खननाची परवानगी देण्यात यावी जेणे करून सर्वसामान्य घरकुल धारकांना आपली घरे पूर्ण करण्यात मदत होईल याकरिता भारतीय जनता पार्टी काटोल विधानसभा क्षेत्राचे वतीने विधानसभा प्रमुख चरसिंग ठाकूर यांचे नेतुत्वात उपविभागीय अधिकारी काटोल यांना निवेदन दिले.
काटोल नरखेड येथे शासनाने जाहीर केल्या प्रमाणे वाळूचे डेपोही उभारण्यात येऊन डेपो मधून घरकुल लाभार्थींना वाळूचा पुरवठा करण्यात यावा.असेही निवेदनात मंजूर करण्यात आले असून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना निवेदन देऊन विनंती करणार असल्याचेही चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले- तसेच वेळ पडल्यास उपोशनाचीही भूमी घडू घरकुल बांधकामा करिता जलालखेडा, भारसिंगी व भिष्णूर व जाम नदी येथून वाळू उत्खननाची परवानगी देण्यात यावी.
यावेळी काटोल तालुका अध्यक्ष निलेश धोटे, नरखेड तालुका अध्यक्ष दिलेश ठाकरे, शहर अध्यक्ष विजय महाजन, विनायक मानकर,नानाजी माळवी, पुरुषोत्तम धोटे, अशोकराव काळे, भाऊराव बारड, गजानन भोयर, प्रमोद निर्वाण, लक्ष्मण मेहर, अँड दिपक केने, डॉ. बी. एम. भूतडा, दिलीप रामापूरे, सुधाकर खेकाडे, सुरेश बाविस्कर, किशोर गाढ़ावे, राजु चरडे, राजेंद् डंबाळे, रमेश भैस्वार, राजेंद्र सरोदे, आकाश मेश्राम, प्रकाश देशभ्रतार, दिनेश चाफले, रामदास कळंबे, दीपक जुमडकर, अशोक कडू उपस्थित होते

CLICK TO SHARE