अपहरण केल्या वरून तिघा विरोधात गुन्हा

सोशल

प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

28/12/2023 विक्की शाहु,याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये सांगितले मी प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. सध्या माझे अल्लीपुर गावात साई नगरी नावाचे ले आउट असुन तेथील प्लाँट विक्री चालु आहे. त्यामद्ये माझे सोबत सोनु आर्या रा. गुरुनानानक वार्ड, हिंगणघाट. व प्रविन घुरुडे रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट हे माझे सोबत पार्टनरशिप मध्ये काम करत आहेत. दि 22/02/2023 रोजी तेलंग पेट्रोलपंपचे बाजुला हिंगणघाट ते जाम हायवे रोडच्या बाजुला असलेल्या सर्विसरोडला लागुन असलेले विजय गुनवंतराव वंजारी रा. गौतम वार्ड, हिंगणघाट याचा 5087 स्केअरफुट चा प्लाँटचा 65 लाख रुपयात सौदाकरुन त्याला ईसारपत्र करुन त्याला 9 लाख 50,000 हजार आर.टी. जिए. व पन्नास हजार नगदी असे दहा लाख रुपये दिले. व सहा महिण्याचे आत विक्री करण्याचा करारनामा लिहुन घेतला. त्या प्लॉटवर 1) विक्की कोटेवार, वासुदेव लाखे, बालू देवडे, अमोल चंदनखेडे, मनोज नवघरे, मनोज जिवतोडे, नकुल चावरे, अमोल हर्डे, मंगेश वरघने, माधव देशपांडे, दिलीप साहारकर असे एकूण अकरा लोंकाचे अतिक्रमन केले होते. त्याबाबत त्याचे अतिक्रमन हटवण्याकरीता मी नगर परीषद हिगंणघाट येथे तक्रार केली. त्यावरुन नगर परीषद हिगंणघाट यांनी सर्व अकरा लोकांना अतिक्रमण हटवण्याकरीता दि 24/03/2023 रोजी नोटीस निर्गमित केली होती. त्यानंतर दहा लोकांनी अतिक्रमण धारकांनीत्यांचे अतिक्रमण काडले परंतु विक्की कोटेवार रा. चोखोबा वार्ड, हिगंणघाट याने त्याचे अतिक्रमन न काढल्याने त्याला अतिक्रमन काढण्या बाबत मी म्हटले तर त्याने अतिक्रमन काढण्याकरीता मला 1,80,000 हजार रुपयाची मागनी केली होती. अतिक्रमन न काढल्याने मी प्लॉट मालक विजय गुनवंतराव वंजारी यांचे मार्फतिने चार ते पाच वेळा नगर परीषद हिगंणघाट येथे तक्रार केली. त्यावरुन नगर परीषद हिगंणघाट यांचेकडुन विक्की कोटेवार याला दि 07/11/2023 चे आत अतिक्रमन काढण्याचे नोटीस तामील करण्यात आले. दि. 06/11/2023 रोजी सकाळी 11/30 वा. ते 12/00 वा. चे सुमारास मी घरी हजर असतांना माझे प्लॉटमधिल पार्टनर सोनु आर्या याने फोन केला की, तुम्ही कोठे आहे. मी त्यांना घरी आहे असे सागितले. पेट्रोल भरण्यास फिदा हुसेने पेट्रोलपंपावर निघत आहे. तर त्यानी सागितले की, तर मला सोनु यार्या यांनी सागितले की तु सद्या येथे येउ नको पेट्रोलपंपच्या बाजुला रोडच्या किणा-यावर विक्की कोटेवार हा त्याची काळ्या रंगाची हंटर कार घेवुन चार लोकासह हजर आहे. मला त्याचे चर्चावरुन असे समजले की, ते म्हणत आहे की, आज विक्कीचा गेम करायचा आहे. मी त्या बाबत पोलीसांना फोन केला आहे. तु ईकडे येउ नको. असे सागितले. तरी देखील मी माझी काळ्या रंगाची जिप कंपास कार क्र. एम.एच 43 बि.के 9240 नि आलो. तर फिदा हुसेन पेट्रोलपंपच्या रोडच्या कडेला विक्की कोटेवार हा त्याचे काळ्या रंगाचे कार मध्ये चार लोकांनसह दिसला. मी कार पेट्रोलपंपाचे बाजुला थाबवुन सोनु आर्या यांचेकडे गेलो. त्याच वेळी माझे ओळखीचे तिन चार लोक तेथे आले. तर विक्की कोटेवार हा त्याचे कार व सोबत असलेल्या ईसमासह तेथुन निघुन गेला. दि 07/11/2023 रोजी नगर परीषद हिगंणघाट व हावे अँथारिटी ऑफ ईडीयाच्या हिंगणघाट विभागाने पोलीसांची मदत घेवुन विक्की कोटेवार याने माझे प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढले. दि 19/12/2023 रोजी मी दुपारी 02/00 वा. चे सुमारास माझे खाजगी कामाने मुकुटबन जि. यवतमाळ येथे गेलो असता मला रहमतखान पठान रा. गौतम वार्ड, हिंगणघाट याचा त्याचे मोबाईल क्र. 8390071571 वरुन फोन आला त्याने हिंदीत म्हटले कहा हो मी म्हटले में वणी मे हु खेत देखने जा रहा हु । तर त्याने म्हटले की, तुमको गिरडके पास एक खेत बताना है । तर मी त्याला म्हटले की, मी सायंकाळी 04/00 वा. पर्यत येतो. असे म्हणुन फोन बंद केला.नंतर मी सायंकाळी 06/30 वा. चे सुमारास घरी येवुन फ्रेश होवुन आराम करुन रात्री 08/30 वा. चे सुमारास माझे पार्टनर सोनु आर्या यांचे नुतन कॉम्लेक्स बस स्टैंडरोडवर असलेल्या मेडीकल दुकानात गेलो. तर तेथे त्याचेमोठे भाउ दिनेश आर्या भेटले. त्यांना मी सोनु आर्या कोठे आहे या बाबत विचारले तर त्यानी सागितले की, त्याना कोनाचा तरी फोन आला व ते त्यांची बुलेट गाडी घेवुन गेले आहे. त्यावरुन मि ते किरायाने राहत असलेले मास्टर कॉलनी येथे गेलो तर त्याचे घराचे बाजुला असलेले हनुमाण मंदीराजवळ रोडच्या बाजुने त्याची बुलेट गाडी उभी दिसली त्यावरुन मी त्याचे मोठे भाउ दिनेश आर्या यांना फोन करुन त्या बाबत सागीतले असता त्यानी म्हटले की, तु तेथे थाब मी येतो. व ते लगेच तेथे आले. त्यानी सोनुची गाडी पाहुन फोन लावला तर सोनुचा फोन बंद होता. त्यांनी म्हटले की सोनु या ठिकाणी गाडी ठेवत नाही. नंतर आम्ही तेथे हजर असता बुलेटच्या बाजुला सोनु आर्या घालत असलेला डोळ्याच्या चश्मा मोडलेल्या अवस्थेत होता. त्यावरुन मी व त्याचा भाउ दिनेश असे सोनु आर्या यांचा शोध घेण्या करीता हिंगणघाट शहरात तसेच आजुबाजुला पाहीले पंरतु सोनु आर्या भेटले नाही. त्याचा शोध घेत असतांना त्याच दिवसी रात्री 11/00 वा. चे सुमारास सोनु आर्याचा भाउ दिनेश यांने सोनुला फोन केला त्यावेळी त्याचा फोन लागला त्यांनी विचारले तु कोठे आहे. तर त्यानी सागितले की, मी मित्रासोबत आहो. घरी येतो. असे हिंदिमध्ये बोलले. दि 20/12/2023 रोजी मी सोनु आर्याचा शोध घेवुन रात्री 12/30 वा. घरी गेलो असता मला दिनेश आर्याचा फोन आला व त्यानी सागितले की, सोनु घर को आया है। त्यावर मी लगेच त्याचे घरी गेलो. तेथे मला सोनु आर्या व त्याचे भाउ दिनेश आर्या हे भेटले त्यांना मी विचारले की, तुम्ही कोठे गेले होते. तर सोनु आर्यानी मला सागितले की, मी दि 19/12/2023 रोजी रात्री 20/00 वा. चे सुमारास खर्रा घेवुन घरी येत असता हनुमान मंदिराजवळ गौतम वार्ड हिंगणघाट येथे मला रहमतखान यास मी दिसलो असता. त्याने मला थाबण्याचा ईशारा केला. त्यावरुन मी तेथे थाबलो असता मी त्याचे सोबत थाबुन बोलत असतांना त्याच वेळी माधुन एक काळ्या रंगाची हन्टर कार आली. त्यामधुन आशिफ साबुद्दीन रा. जगन्नाथ वार्ड व विक्की कोटेवार हे गाडीतुन खाली उतरले. अशिफने माझे जवळ येवुन गाडीमध्ये बस त्यावर मी त्यांना काय झाले ते साग तर त्यांनी म्हटले साथ मे चलो बाद मे बताता हु। मी जाण्यास तयार नव्हतो. तर विक्की कोटेवार यांने माझे गालावर थापड मारली. त्यामुळे माझा चश्मा बुलेटजवळ पडला. त्यावेळी आशिफ व कोटेवार याने त्याचे जवळ असलेल्या शस्त्राचा धाक दाखवुन जबरीने मला त्याचे हंटर गाडीत बसवले. ते मला हायवे रोड़ने शिरुर, अल्लीपुर, राळेगाव मार्गे जंगल भागात नेले. मी त्यांना काय झाले मला कशासाठी नेत आहे. असे विचारत असता मला अशिफ व रहमत यांने हाताने गालावर मारुन साले तेरा पार्टनर विक्की शाहू को बुला उसकी हमको भरत येनुरकर और विक्की कोटेवारने 15 लाख कि सुपारी दि है। त्यावर मी त्याला म्हटले मौ त्याला बोलु शकत नाही. कम ज्यादा क्या है। मैं मेरे हिसाबसे सेटलमेन्ट करता हु। त्यावर मी त्यांना विक्की शाहु कडुन 6 लाख रुपये घेवुन देण्याचे कबुल केले. त्यावरुन आशिफने हंटर गाडी पलॅटवली व राळेगाव फाट्यावर आलो. तेथुन तो गाडीतुन उतरला व विक्की कोटेवार हा गाडी चालवत होता. अशिफने मला म्हटले की तु कल मै फोन करके आदमी भेजुगा उसको पैसे दे देना नही दे देना नही तो मैं तेरे को और तेरे पार्टनर को जानसे मार दूँगा। अशी धमकी दिली. मला विक्की कोटेवार व रहमत खान यांनी मला कापसी, सिरसगाव, वडनेर मार्गे टोल नाका तोडुन मला कलोडे चौकातील मिलींद मोटर जवळ आणुन सोडले असे मला सोनु आर्या यांनी सागितले. त्यावर मी सोनु आर्याना पोलीस स्टेशनला जावुन रिपोर्ट देण्याबाबत म्हटले तर त्यांनी सागितले की, त्यांना त्याचे व्हॉट्सअँपवर वारंवार अशिफचे फोन येत आहे. व तो धमदी देत आहे की, अगर तुमने रिपोर्ट दिया तो, मैं और मेरे आदमी तुमको और तुम्हारे पार्टनर विक्की शाहु को जान से मार देगे. असे सागितल्यावरु त्या भितीमुळे आम्ही रिपोर्ट दिली नाही. दुपारी 12/00 वा. चे सुमारास मला सोनु आर्या यांचा फोन आला त्यानी सागितले की, आशिफचा त्याचे व्हॉट्सअँप नबरवर फोन आला व त्याने म्हटले आहे की, 6 लाख रुपया मधुन 1 लाख रुपयाची आवश्यक्ता आहे. तर मी त्यास पैसे देण्यास टाळले. अशिफ यांनी मला सागितले की, तुझ्याकडे माझा साथीदार यासिन मलक हा येईल त्याला पैसे देशिल असे सागितल्याने मी त्याचे भिती पोटी दि 21/12/2023 रोजी सायंकाळी 07/00 वा. चे सुमारास सोनु आर्या यांचे मेडीकल दुकानावर येवुन अशिफ यानी सागितलेल्या यासिन मलक याला देण्यासाठी एक लाख रुपये नगदी आणुन दिले. दि 22/12/2023 रोजी दुपारी 02/00 वा. चे सुमारास सोनु आर्या यांनी मला फोन करुन सागितले की, आसिफचा माणुस यासिन मलक हा त्याचे मेडीकल दुकानावर आला होता. त्याला त्यानी एक लाख रुपये दिले. तसेच सोनु आर्या यांनी सागितले की, या पुर्वि अशिफ साबुद्दीन याने त्याचे व्हॉट्सअँप नंबरवर बोलनी केल्याची रेकॉर्डिंग व त्याचा माणुस यासिन मलक याला पैसे दिल्याचे सि.सि.टि.व्हि. फुटेजची रेकॉर्डिक त्याचे कडे आहे. असे सागितले होते. दि 27/12/2023 रोजी रात्री 09/00 वा. चे सुमारास सोनु आर्या हे माझे घरी आले. त्यानी सागितले की, त्याना अशिफ शाहुद्दीन व रहमत चा वारंवार व्हॉट्सअॅपवर फोन येत आहे व ते माझे साठी त्यानी कबुल केलेले सहा लाख रुपयातील पाँच लाख रुपये लवकरात लवकर पाठव नाहितर तुला व विक्की शाहू यांचा खुन करु अशी धमकी देत आहे. तर मी सोनुला म्हटले की, आपल्याला त्यांना पैसे द्यायचे नाही आहे त्याची आपण रिपोर्ट करु. अशिफ साबुद्दीन रा. जगन्नाथ वार्ड, हिंगणघाट रहमत खाँ पठान रा. गौतम वार्ड, हिगंणघाट यांनी विक्की कोटेवार रा. चोखोबा वार्ड, हिगंणघाट यांचे सागण्यावरुन त्याने त्यांना माझे 15 लाख रुपयात सुपारी,देवुन माझा पार्टनर सोनु आर्या यास जिवे माण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने धमकावुन हाता बुक्यानी मारहान करुन, चाकूचा धाक दाखवुन अपहरन करुन त्यास त्यानी काळ्यारंगाच्या चार चाकी हंटर गाडीत दि 19/12/2023 रोजी रात्री 08/00 वां चे सुमारास घेवुन जावुन सोनु आर्या यांनी तडजोडीअंती त्यांना सहा लाख रुपय देण्याचे कबुल केल्यावरुन त्याला हिंगणघाट येथे परत आनुन सोडले. व राहिलेली 5 लाख रुपये रक्कम बाबत त्याला वारंवार व्हॉट्सअँपवर फोन करुन खंडनीच्या पैशाची मागणी करुन 1 लाख रुपये यासिन मलक याला देण्यास लावलेत्या वरून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे आरोपी विक्की कोटेवार,आशिफ शाहाबुद्दीन,रहमत खान पठाण यांच्या विरोधात कलम 364-A, ३८५,३८६,120-B,३४ गुन्हा नोंद केला

CLICK TO SHARE