वर्धेचे नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आज वर्धेत
जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार जैयत स्वागत
प्रतिनिधि अरबाज पठाण ( वर्धा )

वर्धा जिल्ह्याला नुकतेच लाभलेले महाराष्ट्राचे वनमंत्री तसेच वर्धेचे नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आज (दि. १७/१०/२३) वर्धेत पालकमंत्री पदग्रहण केल्यानंतर सर्वप्रथम आगमन होत आहे. यानिमित्त्याने वर्धेत वविध कार्यक्रमांचे आयोजन हि करण्यात आलेले आहे.
यापूर्वी वर्धेचे पालकमंत्री पद फार यशस्वी रित्या त्यांनी पार पाडले आहे. त्यातच त्यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्यात झालेल्या विविध विकास कार्यांना पाहता तसेच त्यांचे वर्धा जिल्हा प्रती अनुभव व जनतेची आपुलकी च्या अनुषंगानेच त्यांची वर्धा जिल्हा पालकमंत्री या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे भाजप चे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले. या निमित्त आज (दि. १७/१०/२३) रोजी, त्यांचे वर्धा जिल्ह्यात जय्यत स्वागत करण्यात येणार आहे.
यात सर्वप्रथम हिंगणघाट विधानसभेतर्फे जाम चौरस्ता येथे येथे, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर मदनी येथे व8विविध विकास कार्यांच्या भूमीपूजनाला ते उपस्थित असणार आहेत. यानंतर सेवाग्राम मेडिकल चौक येथे भाजप चे देवळी पुलगाव विधानसभेचे प्रमुख राजेच बकाने यांच्या हस्ते सेवाग्राम येथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांचे स्वागत व सत्कार ही करण्यात येणार आहे. त्यानंतर वर्धा शहरातील गांधी चौक येथे वर्धेचे आमदार पंकज भोयर, यांच्या वतीने पालकमंत्र्यांच्या जैयत स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक सार्वजनिक विश्रामगृह येथे घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत विविध विभागांच्या आढावा बैठकीलाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. वर्धेतील नवरात्री आगमनच्या अनुषंगाने नालवाडी येथी गरबा आयोजनाला त्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राचे वने संस्कृती कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच वर्धेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अगोदरही पालकमंत्री पदावर वर्धेचा कार्यभार सांभाळलेला आहे. या कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना चालना मिळालेली आहे. त्याचबरोबर सेवाग्राम विकास आराखडा हा त्यांच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण विकासाचा घटक राहिलेला आहे. त्यामुळे वर्धेतील सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत गरजांची चांगली जाण ठेवणारे सुधीर मुनगंटीवार या कार्यकाळातही विविध विकास कार्यांना च्या अनुषंगाने तसेच उपक्रमांच्या माध्यमातून वर्धेचा विकास साधणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमात तसेच भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला व सर्व नियोजित ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी स्वागताकरिता उपस्थित राहण्याचे आव्हान वर्धा भाजप चे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी कार्यकर्त्यांना केलेली आहे.