पत्रकाराचे अपहरण करणाऱ्या त्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी,पत्रकार संघाचे वतीने निवेदन

सोशल

प्रतिनिधी:निखिल ठाकरे हिंगणघाट

हिंगणघाट येथील पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य यांची अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी .याकरीता हिंगणघाट पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचे १९डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या घराजवळ बंदुकीच्या धाकावर अपहरण करून खंडणीची मागणी करण्यात आली होती .या संदर्भात या प्रकरणाची माहिती लगेच दुसऱ्या दिवशी ठाणेदार मारुती मुळक व डी .वाय. एस .पी .पंडित यांना फिर्यादी सोनु आर्य यांनी दिली .मात्र कठोर कारवाईचे आश्वासन न मिळाल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली नाही. त्यानंतर ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली व घटनेची तक्रार त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ डिसेंबर रोजी करण्यात आली व त्यावर हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमांमध्ये गुन्ह्याची नोंद करून दोन आरोपींना अटक केली असून एक मुख्य कुख्यात आरोपी फरार आहे .या गुन्ह्यामध्ये शेख आसिफ शेख शहाबुद्दीन व रहमत खान हे कुख्यातगुंड आहे व त्यांच्यावर हत्याचे प्रयत्न,अवैध दारू,हप्ता वसुली अशा गंभीर स्वरूपाचे आरोप असून हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद आहे .या प्रकरणात मुख्य आरोपी शेख अशीच शहाबुद्दीन एक वर्षाकरिता तडीपार होऊन जिल्हा बदलला होता. असे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा मोका यासारखे कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे जेणेकरून हिंगणघाट शहरातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल व शहरात शांतता निर्माण होईल .या प्रकरणात मास्टर माईंड कोण आहे याची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून मा. जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांना उप विभागीय अधिकारी हिंगणघाट व उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट व ठाणेदार हिंगणघाट यांचे मार्फत पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य प्रा. संदीप रेवतकर ,भास्कर कलोडे , मोहम्मद रफीक, रमेश लोंढे, केवलदार ढाले राजेश कोचर ,मुकेश चौधरी प्रदीप आर्य ,नईम मालक, रवी येनोरकर , दीपक सुखवानी , इकबाल पहेलवान ,मोहसीन खान प्रमोद जुमडे आदी पत्रकारांनी केली आहे.

CLICK TO SHARE