उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई

क्राइम

प्रतिबंध केलेला पान मसाला/सुगंधित तंबाखु /इगल/मजा असा किंमती 40 लाख 20 हजार 120/-रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आल्याने जप्त कारवाई गुन्हा नोंद

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोंदिया)

पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे नियंत्रण व मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे….. या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे दिनांक – 28/12/2023 रोजी पोलीस ठाणे नवेगावबांध परिसरात पेट्रोलिंग दरम्यान धाड कारवाई केली असतांना धाबेपवनी चौकात एक आयसर ट्रक संशयीतरित्या दिसून आल्याने त्यास पोलीस पथकाने थांबवुन आयसर ट्रक चालक नामे – ओमप्रकाश देवाजी शिंदे यास ट्रकमध्ये असलेल्या मालाबाबत विचारपूस शहानिशा केली असता त्यांनी उडवा-उडविचे उत्तर दिल्याने सदरचा आयसर ट्रक पो. स्टे. नवेगावबांध येथे आणुन पाहणी केली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेलापान मसाला/सुगंधित तंबाखु /इगल/मजा असा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर संबंधात तात्काळ अन्न व औषध प्रशासनास माहिती देवुन अन्न-औषध सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पान मसाला/सुगंधित तंबाखु /इगल/मजा/ट्रकसह असा *एकुण 40 लाख 20 हजार 120/- रुपयांचा* मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे…. *ट्रक चालक नामे- ओमप्रकाश देवाजी शिंदे वय 35 वर्षे रा. काटोल रोड पेटरी ता.जि. नागपुर* याचेविरुध अन्नसुरक्षा व मानदे कायदा, आणि भादंवि कायद्यान्वये पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे अप.क्र.112/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे… सदरची दर्जेदार धाड कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे नियंत्रणात व मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी – अंमलदार तसेच अन्न सुरक्षा प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे.

CLICK TO SHARE