एम एस आयुर्वेद कॉलेजला पंचवीस वर्षे पूर्ण

अन्य

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव

गोंदिया येथील एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कुडवा गोंदिया च्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली. 2023 पासून महाविद्यालयाला शंभर विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची परवानगी मिळालेली आहे आणि यावर्षी 100 विद्यार्थ्यांची ऍडमिशन झालेली आहे. दिनांक १ डिसेंबर 2023 ला नवीन ऍडमिशन झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या परिचय करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या दरम्यान संक्रमण कालीन अभ्यासक्रम Transitional Curriculum कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांमध्ये बी ए एम एस फर्स्ट इयर ते फायनल इयर पर्यंत सगळ्या विषयांच्या परिचय तसेच महाविद्यालयाच्या परिसराच्या परिचय करून दिला जातो.एम एस आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना 1999 ला झाली .त्याच्या पहिले बॅचला 40 विद्यार्थी होते. 2003 पासून 50 विद्यार्थी साठी परवानगी मिळाली.आणि 60 विद्यार्थ्यांचे परवानगी 2015 वर्षी मिळाली तसेच आता 2023 वर्षे 100 विद्यार्थ्यांचे परमिशन मिळाली विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले.महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच गोंदिया शहर तसेच आजूबाजूच्या गावांना रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा पुरवली जात आहे. तसेच विविध शिबिर आणि जनजागृती कार्यक्रम मार्फत आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसार केला जात आहे. कोरोना काळामध्ये महाविद्यालयाने कोविड केअर सेंटर चालवून आरोग्य सेवा दिली आहे. आजादीका अमृत महोत्सव आणि घरघर आयुर्वेद यासारखे आयुष मंत्रालयाचे कार्यक्रम सुद्धा यशस्वीरित्या पार पाडले आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या प्रथम बी ए एम एस परीक्षा जुलै 2023 ला घेण्यात आली या परीक्षेमध्ये महाविद्यालयाचे 60 विद्यार्थी बसले होते. 60 पैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला. वैदर्भी तित्तिरमारे ही विद्यार्थिनी 80.50 टक्के गुण घेऊन प्रथम आली. महाविद्यालयाच्या या यशा मागे संचालक डॉक्टर श्री सुरेश कटरे सर आणि श्रीमती मीनाक्षी कटरे मॅडम यांचे मार्गदर्शन आहे.

CLICK TO SHARE