वसमत येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुळसी रामकथा

धर्म

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा..वसमत येथील (वसमत नांदेड रोडवरील) विठ्ठल रुक्मिणी मंदिर शाळेच्या बाजूला कनेरगाव चौक येथील संत मारुती महाराज संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत राम कथेचा आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये राम कथेचे कथा बघते ह.भ.प. रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांच्या सरळ वाणीतून दुपारी एक ते चार या वेळेत कथा होणार आहे.तर यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे व त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.हा सप्ताह अनेक मान्यवर मंडळीचा सहकार्याने व संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन नियोजनातून होत आहे. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळात ह.भ.प. गुरुवर्य माऊली महाराज मुडेकर ,३० डिसेंबर रोजी रात्री सात ते नऊ या वेळेत ह.भ.प. तुळशीदास महाराज नळदकर, 31 डिसेंबर रोजी ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग रात्री सात ते नऊ, एक जानेवारी 2024 रोजी ह.भ.प. नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर ,यांचे सात ते नऊ, दोन जानेवारी रोजी ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज राऊत बिडकर रात्री सात ते नऊ, तीन जानेवारी रोजी रात्री ह.भ.प. माऊली महाराज सिंदगीकर रात्री सात ते नऊ,चार जानेवारी रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर, व 5 जानेवारी रोजी सकाळी काल्याचे कीर्तन ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकरयांचे सकाळी 11 ते 1 या वेळेत होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून सप्ताहाची सांगता होईल या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आव्हान संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने या सप्ताहाचा आयोजक यजमान मंडळी व संजयन समितीच्या वतीने करण्यात आले आहे व आज रोजी शुक्रवार पेठ येथून कलश रोहन पदयात्रा काढण्यात आले व तसेच डॉ मारुती क्यातमवार व सौ. क्यातमवर व विविध मान्यवरांनी महाराजांचा श्रीफळ देऊन सत्कार केला.

CLICK TO SHARE