महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक अटक केल्याचे आंदोलन

अन्य

मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

फाउंटेन घोटाळ्याविरोधात जनविकास सेना आक्रमक चंद्रपूर शहरातील विविध पाच चौकात फाउंटेन बांधकाम व उभारणीच्या सव्वादोन कोटीच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील महानगरपालिका इमारतीसमोर घोटाळेबाज अधिकाऱ्यांना अटक केल्याचे प्रतिमात्मक आंदोलन करून जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी चार कार्यकर्त्यांच्या डोक्यावरून आरोपीप्रमाणे काळा कपडा टाकून त्यांचा चेहरा झाकण्यात आला.अटक केलेल्या सर्व चारही प्रतिकात्मक भ्रष्ट अधिकाऱ्यांच हात बांधण्यात आले. सर्व प्रतीकात्मक हॉटेल अधिकाऱ्यांना मनपा इमारती च्या पायऱ्यावरून उतरवून शहर पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्यात आले. या आंदोलनात मनिष बोबडे, शोभा यादव, अपर्णा चौधरी, पुष्पा मुळे, माला गेडेकर, किरण कांबळे, निर्मला नगराळे, स्नेहल चौथाले, माया डोईफोडे, दर्शना पाटील, राधिका माणिकपुरी, सचिन आक्केवार,अमुल रामटेके, योगेश निकोडे, राहुल दडमल, गितेश शेंडे, अमोल घोडमारे, प्रफुल बैरम,अरुण येरगुडे, वसंता जाधव, प्रवीण अत्तेरकर, सुनील ढेकले,घनश्याम येरगुडे, देवराव हटवार, इमदाद शेख, सुभाष फुलझेले, प्रफुल सतभये, नरेंद्र लभाने इत्यादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

CLICK TO SHARE