अल्लीपुर पोलिसांची मोठी कारवाई
प्रतिनिधि सुनील हिंगे (अल्लीपुर)
( अल्लीपुर ) स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी नदीपात्रात अवैध वाळूचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई करीत ट्रॅक्टरसह ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती १५ ऑक्टोंबरला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्लिपुरपोलीस पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा कापसी नदीपात्रात रेती ट्रॅक्टर सह कारवाई करीत पोलिसांनी एकूण ५ ,५८५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक व मालक यांचे
विरूध्द गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई ठाणेदार प्रफुल डाहुले करीत आहे