सावलीत रंगणार क्रिकेटचा थरार

खेल

प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ

सावली पोलिस ठाण्याच्या वतीने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन ४ जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचा थरार सावली तालुक्यातील १६ चमूंमध्ये रंगणार असून, चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. योगी नारायण बाबा क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तर प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार मंगेश मोहोड आदी उपस्थित राहणार आहेत.

CLICK TO SHARE