ज्याला आवश्यकता त्याला मदत हीच खरी समाजसेवा

सोशल

ज्याला आवश्यकता त्याला मदत हीच खरी समाजसेवा

प्रतिनिधी सचिन वाघे ( हिंगणघाट )

(हिंगणघाट) जयंत सुधाकर शेडे वय ४0 रा.डॉ.मुजुमदार वॉर्ड
विल्सन आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेला हा युवक हसमुख व्यक्तिमत्त्वाचा असून नेहमी सर्वाच्या मदतीला धावून जाणारा धडाडीचा कार्यकर्ता.परंतु नियतीने डाव साधला आणि त्याला असाध्य आजार झाला व त्याचे लिवर काम करीनासे झाले आहे. आणि त्याला आर्थिक मदतीची गरज आहे घरची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. वृध्द- आई वडील,पत्नी,दोन छोटी मुलं हा त्याचा परिवार.
जयंत आतापर्यंत रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे.परंतु ह्या जीवघेण्या आजाराने तो घरीच आहे.वृध्द वडील मोहता मिल मध्ये कामगार म्हणून रिटायर्ड झाले आहे. तरुण मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त असून उपजीविकेचे साधन म्हणून या वृद्धापकाळात ते जेवणाचे डब्बे घरोघरी पोहचवून देण्याचा व्यवसाय करतात.
तरुण मुलाला लिव्हर ट्रान्सप्लांटची नितांत गरज आहे आणि 30 लाखाचा खर्च नागपूर येथील न्यूइरा हॉस्पिटलचे डॉ राहुल सक्सेना यांनी सांगितलेला आहे.हा खर्च अफाट आहे आणि त्याच्या परिवाराला हा एवढा खर्च करणे अशक्य आहे. हे सर्व आज शक्य आहे. आज ही मानवतेचा दुष्टिकोनातून विचार करणारे जिवंत आहे ज्याला आवश्यकता त्याला मदत हीच खरी ईश्वर सेवा!

:Jayant Sudhakar Shende
ACCOUNT NO : 100210014017554
IFSC CODE YESB0VMUB01
G Pay Phone Pay 7218834994

CLICK TO SHARE