जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ विशाल कदम
दिनांक. १६/१०/२०२३ रोजी यवतमाळ जिल्हा अनुदानित वसतीगृह कर्मचारी संघटना यांनी हक्काची वेतनश्रेणी मिळुन द्यावी या करिता मागितली पुढील प्रमाणे परवानगी. पत्राचे स्वरूप असे की उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, आम्ही अनुदानित वसतीगृह कर्मचारी तुटपुंज्या मानधना अभावी हवालदील झालेले आहेत. विद्यमान शासनाने सदरील कर्मचान्यांना समान काम-समान वेतन या धोरणानुसार वेतनश्रेणी मागील ३० वर्षापासून लागू करावी यासाठी विविध आंदोलने, उपोषणे संघटनेमार्फत करण्यात येत आहे. परंतु आजपर्यंत न्याय मिळाला नाही. तरी विद्यमान शासनाने अनुदानित वसतीगृह कर्मचान्यांना वेतनश्रेणी लागू न केल्यास सदर पत्र दिल्याच्या दिनांकापासून आम्हाला आमच्या हक्काची वेतनश्रेणीचा निर्णय आठ दिवसात न झाल्यास विषयान्वये सर्व कर्मचारी सामुहिकरित्या आत्मदहन / आत्महत्या, फाशी, विषप्राशन करून जीवन संपविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच कुठल्याही अप्रिय घटनेस संबंधी शासन-प्रशासन जबाबदार राहीला असे आव्हान केले.