मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको,जलालखेडा येथे ओबीसी जनजागृती रथयात्रा

धर्म

नागपूर जिल्ह्यात ओबीसी जनजागृती रथयात्रेचे आयोजन.प्रतेक गावात रथयात्रेचे जंगी स्वागत.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा ( त. 3): ओबीसी समाजाच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी नागपूर जिल्ह्यात 31 डिसेंबर पासून जनजागृती रथयात्रा काढण्यात आली आहे. नागपूर येथून निघालेली जनजागृती रथयात्रा संपूर्ण जिल्ह्यात जात असून सर्वत्र या रथयात्रेचे जंगी स्वागत केले जात आहे. तसेच गावो गावी रथ यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध नसून मराठा समाजाला मिळणार आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्षणातून देण्यात येऊ नये ही भूमिका असल्याचे या यात्रेतून सांगण्यात येत आहे. सर्व ओबीसी समाजाने एकत्र येऊन आपल्या समजसाठी लढण्याची गरज असल्याचे या यात्रेतून सांगण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या खच्चीकरणाचे काम सरकार करीत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये, ही लढाई आपल्या हक्काची आहे, असे विचार या रथयात्रेच्या वेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले. जलालखेडा येथे रथयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. रथ यात्रेत जलालखेडा येथील सुपुत्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट केली. रथयात्रेत आलेल्या मान्यवरांचे हार देऊन जलालखेडा वासियानी स्वागत केले. तसेच बस स्थानक परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच कैलास नीकोसे, अतुल पेठे, सुधीर खडसे, प्रमोद पेठे, योगेश मानकर, विनोद घोरमाडे, सुरेश ठाकरे, सुरेश लोहे, हरी सावरकर, चिंटू धोटे, महेंद्र कुवारे तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. फोटो ओळी. जनजागृती रथयात्रेचे स्वागत करताना गावकरी.

CLICK TO SHARE