गोल पुलिया चे काम सुरू असताना वस्ती विभाग आम नागरीक त्रस्त

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग गोल पुलियाची वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी केले रेल्वे रोको आंदोलन,अखेर प्रशासन नरमले बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग असलेला रेल्वेचा गोल पुलियामधून वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व चेतन गेडाम युवा कांग्रेस महासचिव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पर्यतनात असून त्यांच्या आंदोलनाचा अखेर यश आले आहे. दरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटली असून ती देखील तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे. परिणामी मागील 18 दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करम्यात आली असून शाळकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कार साठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळं तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला होता. त्यानंतर नागरिकांनी रेल्वे मार्ग रोखुन धरला. त्यामुळं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.यावेळी तहसीलदार ,पोलीस प्रशासन,जी आर पी पोलिस, पाणी पुरवठा अधिकारी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजू झोडे व नागरिकांसोबत चर्चा केली. अखेर रेल्वे प्रशासनाने गोल पुलियाची वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन देताच हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संपत कोरडे,चेतन गेडाम,श्यामभाऊ झिलपे, बिलू गुप्ता, विशाल सातपुते, मोहम्मद पठान, बालकृष्ण कडेल,सुनिल मोतिलाल, पत्रकार आदि नागरिक उपस्थित होते.

CLICK TO SHARE