कावराबांध ग्राम पंचायतीचे मनमानी कारभार,ऑपरेटर संपावर गाव वार्यावर

अन्य

प्रतिनिधी / सालेकसा

तालुक्यातील ग्राम पंचायत कावराबांध नेहमीच काही न काही विषयावरून चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम पंचायत संगणक परिचालक संपावर गेले असल्याने ग्राम पंचायतीचे कारभार चालविण्याची जबाबदारी ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी सांभाळून पर्यायी व्यवस्था करण्याबाबत हालचाली सुरु केले आहेत. परंतु कावराबांध ग्राम पंचायत येथील संगणक परिचालक संपावर गेले असल्यापासून ग्राम पंचायत भगवान भरोसे सुरु आहे. कधी ग्राम पंचायतीला ताला तर कधी दुपारी ३ वाजता सुरु होणे. ग्राम पंचायतीच्या अश्या भोंगळ कारभारापाई नागरिकांना वारंवार चकरा मारून सुद्धा सुविधा मिळत नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राम पंचायत सरपंच आणि सचिव यांचे गावाकडे लक्ष नसल्याने ग्राम पंचायत केवळ पांढरा हत्ती म्हणून उभी असल्याची चर्चा गावकर्यांत आहे. ग्राम सेवक आणि सरपंच असूनही ग्राम पंचायत मध्ये उपस्थित राहत नसल्याने नागरिकांमध्ये रोष बघावयास मिळत आहे. संगणक परिचालक जरी संपावर असेल तरी पर्यायी व्यवस्था करणे ही ग्राम पंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांची जबाबदारी असूनही अशी परिस्थिती निर्माण होणे ही शोकांतिका आहे.

CLICK TO SHARE