तालुका अजय दोनोडे प्रतिनिधी आमगाव (गोंदिया)
(गोदिया )स्थानिक एस. चंद्रा महिला महाविद्यालय आमगाव येथे दिनांक १६ ऑक्टोंबर २०२३ ला महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग, आहारशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश तितिरमारे तर प्रमुख पाहुणे डॉ. ललितकुमार ठाकूर भूगोल विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. आशिष थूल आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रा. दीक्षा बडोले उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश तितिरमारे यांनी विद्यार्थिनींना निरोगी आयुष हि आजच्या काळातील सगळ्यात महत्वाची बाब असल्यामुळे त्याकळे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच अन्न व संतुलीत आहाराबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. ललितकुमार ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनी ना सुदृढ आरोग्य प्राप्तीसाठी आपल्या आहारावर भर देणे किती गरजेचे आहे आणि चांगले अन्न शरीरासाठी किती महत्वाचे हे सांगितले. तर कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दीक्षा बडोले यांनी आपल्या मार्गदर्शनात जागतिक अन्न दिवस साजरा करण्याचे महत्व सांगितले व पौष्टिक आहार घेतल्याने होणारे फायदे व निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे शरीराला आवश्यक आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कु.निकिता पोगळे तर आभार प्रदर्शन कु.पायाल गोंधरे यांनी केले. या कार्यक्रमाला देवानंद खोब्रागडे, डॉ.अजय मून, डॉ.चंदा गावंडे, प्रा. स्वप्नील भगत , प्रा. कमलेश पाटील, प्रा.सौरभ बागडे, प्रा.उत्तरा तागडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जयेश सहारे,राजेश हातझाडे, थानसीग ठाकूर, हेमकृष्ण काठाने, मंगल गोंडाणे, अमर गोडसे, वर्षा वांडरे,निर्दोष सहारे, विनोद डोंगरवार व विद्यार्थीनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.