सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गणखैरा ता. गोरेगाव जि. गोंदिया च्या चार किर्तनाचे प्रश्न

धर्म

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगाव (गोदिया)

गोरेगांव- सार्वजनिक दुर्गा उत्सव कार्यक्रमानिमित्त किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रबोधनकार ह. भ. प. श्रीमती सौ जानकाबाई आत्माराम वाढई मु. पो. नवरगांव डला ता. जि. गोंदिया, यांच्या प्रबोधनाचे आयोजन होते. जिल्हयात नवरात्रोत्सव जिल्ल्यात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या निमित्त विविध सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यात प्रबोधनात्मक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने सार्वजनिक सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती गणखैरा च्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनकार हभप सौ जानकाबाई आत्माराम वाढई यांनी वर्तमान परिस्थितीनुसार समाज जागृतीवर प्रवचन करतांनी स्वच्छतेप्रती सर्वानिच जागरूक राहण्याची गरज आहे. कर्ज काढून अत्रा, लग्न करू नका. सुतीवर अवाजवी खर्च करू नका. प्राणीमात्रावर दया करा, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मुलन, जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे असे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचारआत्मसाथ करन समाजानी कार्य करावे, असे आपल्या प्रवचनातून उद्बोधन केले.

CLICK TO SHARE