प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर
काटोल:विधानसभा मतदारसंघातील शेतीचा पंचनामा करून तात्काळ मदत करा – चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन काटोल काटोल विधानसभा मतदारसंघात शनिवारी रात्री एक ते रविवारी पहाटे अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे संत्रा,मोसंबी, हरभरा, गहू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने नुकसान भरपाई देण्याची.मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांना निवेदन देऊन केली भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजप काटोल विधानसभा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर, माजी आमदार डॉ.आशिष देशमुख, आमदार टेकचंद सावरकर,किशोर रेवतकर, काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. भाजप काटोल नरखेड विधानसभा अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संत्रा, मोसंबी, गहू, हरभरा आणि गोबी, पालक भाजीपाला चे नुकसान झाले कापूस पिकाला सुरुवात झाली होती.गारपिटीमुळे जमीनीवर फुले गळले माझ्या भागातील काटोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करा.खामली ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदा केणे व उपसरपंच विनोद केणे यांनी सांगितले की, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.परंतु ऑनलाइन तक्रार करण्यासाठी फोन उचलत नाही ॲपवर ओ.टी.पी.जात नाही तहसीलदार राजू रणवीर, काटोल तहसील कृषी अधिकारी विक्रम भवारी यांनी सर्व शासकीय यंत्रणां ला.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे व सर्वेक्षणाचे काम सुरू केल्याची माहिती दिली.