लोहारी सावंगा येथे भाजपचे “गाव चलो” अभियान

अन्य

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव

काटोल:दि.१०.०२.२०२४भाजपाचे गाव चलो अभियान लोहारीसावंगा येथून प्रारंभ झाला. त्या अनुषंगाने ‘बुथ कमिटी – सुपर वॉरियर्स – पन्ना प्रमुख’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.तदनंतर मणिपूर येथे सन 2001 मध्ये शहीद झालेल्या स्व. किशोर हरणे यांच्या परिवाराला भेट देऊन स्व. किशोर हरणे च्या फोटोला मालाअर्पण करून लोहारीसावंगा येथील प्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा अर्चना करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. गावातील शेतकरी उत्पादक गट, युवक , जनसंघाचे कार्यकर्ते, विरोधी पक्षातील कार्यकर्ते, सरपंच,माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, पोस्टमन, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक इत्यादी नागरिकांसोबत बैठकीचे आयोजन करून अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यासोबतच गावातील पांधन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भाजपावर विश्वास ठेवून ग्रा.प.खराळा येथील सरपंच राहुल कामडी यांनी पक्ष प्रवेश केला. परिसरात दुर्लक्षित असलेला खैरी तलावाविषयी माहिती जाणून घेत लवकरच तलावाकरीता सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन याप्रसंगी चरणसिंग ठाकूर यांनी दिले. दुसऱ्या दिवशी लोहारी सावंगा येथील चहा टपरीवर चहा घेऊन गावातील शेतकऱ्यांसोबत “चाय पे चर्चा” करण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त विंग कमांडर एअर फोर्स अविनाश मुठाळ, डॉ.सौ. वसुंधरा मुठाळ, माजी सैनिक मधुकर वाघमारे, उकेश चव्हाण, दिलेश ठाकरे, सतीश रेवतकर, दिनेश चापले, भूषण भोयर, वसंतराव चापले, हरिभाऊ धांडे, प्रदीप धांडे, ऋषिकेश वानखेडे, राजेंद्र जवळकर, ज्ञानेश्वर रगतपुरे, मनराज चापले, हरि राऊत, मनोहर राऊत, महादेव राऊत, नसीर शेख, मेहबूब शेख, संजय मानेराव, रमेश सावरकर, नामदेव बागडे, कपेश्वर रगतपुरी, गोपी राऊत, बंडू डेहनकर, पुंडलिक बारई, नामदेव बावणे, ताराचंद पेरोडिया, निखिल फंदी, गौरव अढाऊ, धनंजय सुरजुसे, वासुदेव इंगळे, खुशाल बर्डे उपस्थित होते.

CLICK TO SHARE