डान्स स्पर्धेत कल्याणी खडसे हिने पटकाविला प्रथम क्रमांक; पवनार येथे ‘मैयाराणी नवरात्र उत्सव समिती तर्फे’ आयोजन

सोशल

प्रतिनिधि :राहुल काशीकार

पवनार : येथे बाजार चौकात ‘मैयाराणी नवरात्र उत्सव समिती तर्फे’ प्रथमवर्षी 20 ऑक्टोबर रोजी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी खडसे हिने पटकविला तर द्वितीय सृष्टी वानखेडे, तृतीय आशु नगराळे हे स्पर्धेक विजेता ठरले.

या स्पर्धेसाठी अवचट इंडस्ट्री वर्धा
सचिन सोनटक्के यांच्यातर्फे
प्रथम पारितोषिक तर द्वितीय नितीन कवाडे, तृतीय सतीश खेळकर, तर प्रोत्साहन मैया राणी नवरात्र उत्सव मंडळातर्फे देण्यात आले. स्पर्धेत पन्नासच्यावर स्पर्धेकांनी सहभाग घेतला.

यावेळी मंचावर जयंत गोमासे, नितीन कवाडे, सतीश खेळकर, सचिन सोनटक्के, अध्यक्ष शेखर भोयर, प्रशांत भोयर, सुभाष पाटील, श्रीकांत तोटे आदी उपस्थित होते. विजेता स्पर्धेकांना
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी
रवी कोसे,गणेश वाटकर फाल्गुन आंबटकर, आशिष भोयर, नितीन भोयर,सतीश भोयर, राजू देवतळे, सुरेश इखार, गजानन दिवे, गोपाळ दांडेकर, प्रफुल भोयर, राजू लाडे बाबाराव मेहर, लक्ष्मण सातपुते, निलेश खेलकर,कार्तिक वाटकर मारोती घुगरे यांच्यासह आदीने सहकार्य केले.

CLICK TO SHARE